फलटण : प्रतिनिधी
जिंती नाका येथे कंटेनर आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवार ५ फेब्रुवारी) सकाळी ७.३० वाजता झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंती नाका परिसरात फोर्स मोटर्सच्या समोर फलटणच्या दिशेने दूध घेऊन जाणाऱ्या टँकर (MH 11 AL 5375) व पुण्याहून येणारा कंटेनर (MH 46 BB 1845) यांच्यात समोरा समोर धडक झाली. यावेळी रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्रकलादेखील टँकरने धडक दिली. या अपघातात टँकरमधील दूध संपुर्ण रस्त्यावर सांडले. तसेच कंटेनरचा चक्काचूर झाला असून डिझेल संपुर्ण रस्त्यावर पसरले आहे.
व्हिडिओ : यशवंत खलाटे