Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Satara › साताऱ्यात पानटपरीतून २ जिवंत काडतुसे जप्त

साताऱ्यात पानटपरीतून २ जिवंत काडतुसे जप्त

Published On: Aug 22 2018 12:54PM | Last Updated: Aug 22 2018 12:57PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील तांदुळआळी परिसरातील शिवराज पान टपरीमधील चालकाकडे ३०३ बोअरचे दोन जिवंत राऊंड (बंदूकीच्या गोळ्या) सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित शिवा बाळू अहिवळे (वय २८, रा.मंगळवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी एलसीबीचे पोलिस अधिकारी, कर्मचारी सातार्‍यात ठिकठिकाणी गस्त घालत होते. यावेळी तांदुळआळी परिसराती एका पान टपरी चालकाकडे बंदूकीच्या विना परवाना गोळ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुपारी ५ पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी शिवराज पान टपरी चालकाकडे चौकशी करुन पानटपरीची झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयिताला ताब्यात घेतले व दोन्ही जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. संबंधित बंदूकीच्या एका ‘गोळीवर १९४३ सीएसी कंपनी’ तर दुसर्‍या गोळीवर ‘१९४४ जीआयआय कंपनी’ असे नाव कोरलेले आढळले आहे. पोलिसांनी पानटपरी केलेल्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली व बघ्यांची गर्दी उसळली.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून संशयितांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण फडतरे यांनी तक्रार दिली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलिस हवालदार प्रवीण फडतरे, शरद बेबले, निलेश काटकर, एम.एम.देशमुख, एम.एन.मोमीन, एस.पी.जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.