Wed, Jan 16, 2019 15:36होमपेज › Satara › तुळशीराम चांदणेला एक दिवसाची पोलिस कोठडी

तुळशीराम चांदणेला एक दिवसाची पोलिस कोठडी

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:21PMकोरेगाव : प्रतिनीधी 

भाकरवाडी ता.कोरेगाव येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असणारा मुख्याध्यापक  तुळशीराम अंकुश चांदणे याला कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, भाकरवाडी ता. कोरेगाव येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यात नोंद केली होती.

कोरेगावच्या पोलिस उपअधिक्षक कु.प्रेरणा कट्टे व परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक कु.नंदा पाराजे यांनी तात्काळ जलद तपास करीत तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याध्यापक तुळशीराम  चांदणे याला अटक केली.  त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.