Fri, Oct 18, 2019 15:11होमपेज › Satara › कडकडीत बंद पाळत शहिदांना श्रद्धांजली वाहिली

कडकडीत बंद पाळत शहिदांना श्रद्धांजली वाहिली

Published On: Feb 16 2019 9:49AM | Last Updated: Feb 16 2019 9:49AM
कराड : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी कडकडीत बंद पाळत कराडकर (जि. सातारा)  नागरिकांनी शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.  तसेच या हल्ल्याच्या निषेधार्थ सकाळी अकरा वाजता निषेध मोर्चाही आयोजित करण्यात आला आहे.

 शुक्रवारी सायंकाळी कराड मधील चावडी चौक परिसरात सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो कराडकर नागरिकांनी शोक सभा घेत शहीद झालेले 42 भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शनिवारी बंद पाळण्याचे आवाहन करत निषेध मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. या आवाहनास शनिवारी सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.