Mon, Apr 22, 2019 22:13होमपेज › Satara › वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर (Video)

वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर (Video)

Published On: Feb 14 2018 5:46PM | Last Updated: Feb 14 2018 5:46PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील वासोटा किल्ला हा देशभरातील ट्रेकर्सना भूरळ पाडणारा किल्ला आहे.  मंगळवारी महाशिवरात्रीनिमीत्त २५ जणांची टीम वासोट्याच्या थरारक सफरीसाठी सज्ज झाली होती. सकाळी ६ वाजता हे ट्रेकर्स सातार्‍यातून निघाले. बामनोलीत पोहचल्यानंतर बोटिंग करत ते ९ वाजता वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचले.  साधारण तीन तासाच्या ट्रेकिंग नंतर हे ट्रेकर्स गडावर पोहचले. गडाच्या प्रवेशव्दाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यानंतर शिवसागर जलाशयाचा आणि लांबवर पसरलेल्या जंगलाचा देखावा सर्व ट्रेकर्सना मुग्ध करुन टाकणारा होता.

साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखा दुर्ग आहे. याच वासोटा किल्ल्यावरुन २ तासांच्या अंतरावर असलेल्या श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थानपर्यंतचा ट्रेक करण्यासाठी  पाण्यानं वेढलेलं हिरवे गर्द डोंगर आणि पाणी कापत जाणाऱ्या बोटची  वासोटा ते नागेश्वर एक थरारक सफर.
व्हिडिओ : साई सावंत