Tue, Jul 16, 2019 22:08होमपेज › Satara › वाहतूक पोलिसास मारहाण

वाहतूक पोलिसास मारहाण

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:42PM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

बुलेट बाजूला घेण्यासाठी सांगितल्याने पाल (ता. कराड) येथे वाहतूक पोलिसास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अण्णासाहेब बाबुराव मारेकर यांच्या तक्रारीवरून विकास दादू नलवडे (वय 45, रा. शहापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी पाल येथील खंडोबा यात्रा झाली आहे; मात्र अजूनही दर्शनासाठी पालीत भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळेच अण्णासाहेब मारेकर हे उंब्रज पोलिस ठाण्यातील आपल्या सहकार्‍यांसह बंदोबस्तासाठी पालमध्ये तैनात होते.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मारेकर कर्तव्य बजावत असताना मंदिरालगतच्या चौकात विकास नलवडे यांनी बुलेट लावली होती. यावेळी बुलेट बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर नलवडे यांनी मारेकर यांना बुलेट बाजूला घेणार नाही, असे म्हणत वाद घातला. तसेच यावेळी मारेकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक फौजदार कांबळे तपास करत आहेत.