Sun, May 19, 2019 14:20
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पुण्यातील पर्यटकाचा ठोसेघर येथे मृत्यू

पुण्यातील पर्यटकाचा ठोसेघर येथे मृत्यू

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

ठोसेघर, ता. सातारा येथील धबधबा पाहण्यासाठी मित्रांसमवेत आलेल्या अशोक प्रभाकर शिदोरे (वय 68, रा. ढोले रोड, शिवाजीनगर, पुणे) या पर्यटकाचा शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्याच परिसरात चक्‍कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाला. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पुण्यातील शिवाजीनगर भागात असणार्‍या ढोले रोडवर अशोक प्रभाकर शिदोरे हे कुटुंबीयांसमवेत राहण्यास होते. शिदोरे हे दहा वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमधून सेवानिवृत्त झाले होते. शुक्रवारी सकाळी शिदोरे हे सेवानिवृत्त झालेल्या बँकेतील तीन सहकार्‍यांसह कारमधून कास परिसरात फिरण्यासाठी आले होते. ते दुपारी कास परिसरात पोहोचले. या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहून शिदोरे व इतर कारमधून ठोसेघर परिसरात आले. या ठिकाणी असणार्‍या मुख्य धबधब्याकडे शिदोरे व सहकारी गेले. धबधबा पाहून परतत असतानाच शिदोरे यांनी चक्‍कर येत असल्याची माहिती सोबत असणार्‍यांना दिली.

याच दरम्यान शिदारे चक्कर येवून जागीच बेशुध्द पडले. यानंतर जमलेल्या स्थानिकांनी व सहकार्‍यांनी शिदोरे यांना उचलून कारपर्यंत आणले. या ठिकाणाहून कारमधून शिदोरे यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिदोरे यांच्या कुटूंबियांना दिल्यानंतर नातेवाईकांनी सातार्‍याकडे धाव घेतली. या घटनेची नोंद प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.