Tue, Jun 18, 2019 21:00होमपेज › Satara › मतिमंद भाचीवर अत्याचार

मतिमंद भाचीवर अत्याचार

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:19PM

बुकमार्क करा
औंध : वार्ताहर

खटाव तालुक्यातील येळीव गावात एका 35 वर्षीय मतिमंद भाचीवर चुलत मामानेच बलात्कार केला. त्यास औंध पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेचे कुटुंबीय मुंबई येथे राहत असून या महिलेचे आजोळ येळीव आहे. सुट्टी असल्याने सर्व कुटुंंबीय दि. 23 रोजी गावी आले होते. दि. 25 रोजी पीडित महिलेला येळीव येथे मामाकडे थांबवून बाकीचे कुटुंबीय पाटण येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते.  यादरम्यान चुलत मामाकडून ही नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.

कुटुंबीय परत आल्यानंतर पीडित महिलेने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने औंध पोलिसांकडे फिर्याद दिली. अधिक तपास स.पो.नि. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुधीर येवले करीत आहेत.