Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Satara › मुलीवर अत्याचार; चौघांना कोठडी

मुलीवर अत्याचार; चौघांना कोठडी

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:42PM

बुकमार्क करा
खटाव/ वडूज : प्रतिनिधी

खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी चार जणांना गुरुवार, दि.  18 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिले. खटाव तालुक्यातील चार नराधमांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात रविवारी दाखल झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के  यांनी कार्यतत्परता दाखवत शिताफीने संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता,  चौघांना गुरुवार दि.  18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

घटना घडलेल्या खटाव तालुक्यामधील गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी, औंध, म्हसवड, पुसेगाव, वडूज  पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते. राज्य पोलीस बल गट, स्ट्रायकिंग फोर्स, क्यू आर टी आदी फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून गावाशेजारील कातरखटावमध्येही  पोलिसांची एक जादा तुकडी तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती.