Mon, Jun 17, 2019 04:37होमपेज › Satara › मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक 

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 11:02PMसातारा : प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी यांच्याकडील दि. 9 फेब्रुवारी 2018 च्या आदेशानुसार राज्यातील मार्च ते मे 2018 या कालावधील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्‍तपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या कार्यक्रमानुसार दि. 27  फेब्रुवारी रोजी मतदान व दि. 28 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया कालावधी दरम्यान आयोजित  केले जाणारे विविध कार्यक्रम, मिरवणुका या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, मिरवणुकीच्या मार्गासंबंधाने व मिरवणुकीतील व्यक्‍तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे, लाऊड स्पीकरचा वापर योग्यप्रकारे व्हावा याकरिता, निर्बंध घालणे आवश्यक आहे.

ज्याअर्थी उपरोक्‍त कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेले सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षक, सर्व सहाय्यक पोलिस निरीक्षक, सर्व पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व  पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकार प्रदान करणे जरुरीचे आहे.

त्याअर्थी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन, कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताकामी नेमलेल्या सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षक, सर्व सहाय्यक पोलिस निरीक्षक, सर्व पोलिस उपनिरक्षिक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलिस अधिकारी / कर्मचार्‍यांनी दि. 27 ते 28 फेब्रुवारी या कालावधीकरिता त्या त्या पोलिस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून वाहनांच्या नियमनासंदर्भात, मिरवणुकीच्या मार्गासंबंधाने मिरवणुकीतील व्यक्‍ती अथवा व्यक्‍तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे, या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार दिले आहेत.