Tue, Apr 23, 2019 20:09होमपेज › Satara › फळणी गावानजीक डंपर पलटी 

फळणी गावानजीक डंपर पलटी 

Published On: May 01 2018 1:12PM | Last Updated: May 01 2018 1:12PMबामणोली (जि. सातारा ): वार्ताहर

फळणी (ता.जावली )गावचे हद्दीत मुनावळे फाट्याच्या खालील  बाजूच्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने (एम एच११ ए ल २९८८) डंपर पलटी झाला. यात चालक लक्ष्मण लिंगप्पा आवेरी (वय ३५, सध्या राहणार समर्थ मंदिर सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे. 

या अपघातामुळे बामणोलीकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत होती. याच धोकादायक वळणावर पूर्वी क्षेत्र विनायकनागर या ठिकाणी गणेश जयंती करीता इस्लामपूर येथून आलेली बस पलटी होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्‍यामुळे  या वळणावर तात्काळ बांधकाम विभागाने मार्ग काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

Tags : satara district falni taluka jawali, Tipper, accident