Wed, Jul 17, 2019 12:15होमपेज › Satara › मटका, जुगारप्रकरणी वडूजचे तिघे तडीपार

मटका, जुगारप्रकरणी वडूजचे तिघे तडीपार

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:36PM

बुकमार्क करा

खटाव  : प्रतिनिधी

वडूज येथे मटका जुगार चालवणार्‍या तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी सहा महिन्यांसाठी तडीपार केले. दरम्यान, वडूज येथील या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जयवंत बजरंग जाधव (वय 34), मयूर सोपान भोसले (वय 30) व पृथ्वीराज बाळासो चव्हाण (वय 32, सर्व रा. वडूज) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जयवंत जाधव हा टोळीप्रमुख असून संशयित तिघांवर मटका जुगारप्रकरणी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.  त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. 

संशयितांच्या वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. वडूज पोलिसांनी तिघांचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. त्यानुसार सोमवारी तिघांनाही खटव, माण, कोरेगाव, कराड तालुका येथून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, 48 तासांच्या आत संशयितांना तडीपार करावे, असा आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील  यांनी दिला आहे.