Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Satara › यवतेश्‍वर येथे दारूचे तीन बॉक्स जप्‍त; दोघांना अटक

यवतेश्‍वर येथे दारूचे तीन बॉक्स जप्‍त; दोघांना अटक

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

कास रस्त्यावरील यवतेश्‍वर येथे चोरट्या दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. संबंधित ओम्नी कारसह 14 हजारांची दारू जप्‍त केली. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक केली आहे.जितेंद्र राजेंद्र वैराट (वय 32, रा. सोमवार पेठ), स्वप्निल ऊर्फ गुंड्या सतीश कदम (24, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार निखिल घाडगे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी रात्री आठ वाजता यवतेश्‍वर येथील पोलिस चौकीजवळ सापळा रचला. यावेळी मारुती ओम्नी (एम.एच. 11 बीव्ही 1045)  कासकडे जात असताना पोलिसांनी थांबवली. पाहणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारू होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यामध्ये 7 हजार 488 रुपयांचे देशी दारूचे 3 बॉक्स व 6 हजार 240 रुपये किमतीची विदेशी दारू असा मुद्देमाल होता. पोनि पी. डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुहास पवार, रमेश शिकरे, निखिल घाडगे, संदीप कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

कास रस्त्यावर दारू व्रिकी?

कास रस्त्यावर दारूचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. एरव्ही काहीजण दारु पिण्यासाठी कास रस्त्यावर जात असल्याचे सर्वश्रुत आहे. शुक्रवारी रात्री मात्र देशी दारुसह विदेशी दारु सापडल्याने ही नेमकी दारु कुठे विकली जात आहे? यामध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? सातार्‍यातील कोणत्या दुकानातून विना परवाना दारु विकली जात आहे? यामध्ये पोलिस आणखी कोणाला सहआरोपी करणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार संशयितांनी गेट टुगेदर असल्याने बामणोली येथे दारु नेत असल्याचे सांगितले असून पोलिस खातरजमा करत आहेत.