होमपेज › Satara › तीन वारकर्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू

तीन वारकर्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:36PMफलटण : प्रतिनिधी 

माऊलींच्या पालखीचे तरडगाव ते फलटण प्रस्थान होत असताना तीन वारकर्‍यांंचा हृदयविकाराच्या तीव्र  धक्क्याने मृत्यू झाला. 

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली  माहिती अशी, कलुबा तुळशीराम सोलने (वय 65, रा. शिंदखेड राजा, जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय 55, रा. मुकुंदवाडी, ता. जि. औरंगाबाद) या दोन व अजून एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू  झाला.

वारकरी व भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फलटणचे प्रांत संतोष जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी  दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्‍त केले .