Wed, Sep 19, 2018 23:02होमपेज › Satara › पेट्री बंगला शाळांमध्ये चोरी

पेट्री बंगला शाळांमध्ये चोरी

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 11:52PMबामणोली : वार्ताहर

सातारा - बामणोली रोडवर असणार्‍या पिसानी मंदिरानजीकच्या आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्‍वरनगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेट्री बंगला या दोन शाळांना चोरट्यांनी लक्ष केले.  दोन्ही शाळांमधील शालेय पोषण आहारासाठी पुरवण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या दोन्ही टाक्या, इन्व्हर्टर चोरून नेला. ग्रंथालय फोडण्याचा प्रयत्न केला. 

पेटेश्‍वरनगर व पेट्री बंगला या शाळांमध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून शैक्षणिक साहित्याचेही नुकसान केले आहे. ऐवज लुटून चोरटे पसार झाले असून या घटनेने कास पठार परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अशा चोर्‍या पूर्वी कास तलाव परिसरात असणार्‍या छोट्या मोठ्या हॉटेलांमध्ये होत होत्या मात्र त्या ठिकाणी वास्तव्य सुरू झाल्याने चोर्‍या थांबल्या होत्या. मात्र कास रोडवर होणार्‍या चोर्‍या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.