Sat, Feb 23, 2019 14:53होमपेज › Satara › सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

Published On: May 05 2018 4:24PM | Last Updated: May 05 2018 4:24PMसातारा : प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी शाखा फोडून चोरट्यांनी ४0 हजारांचे साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी  सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एनआयसी शाखा असून दि. १ मे रोजी शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर शाखेतील कामकाज आटोपून कर्मचारी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना शाखेच्या दरवाजाचे कुलूप उचकटल्याचे आढळले.

त्यांनी आत जावून पाहिले असता, सुमारे ४0 हजारांचे साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. याची माहिती त्यांनी नंतर वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी पाहणी करत याबाबतची तक्रार नोंद करण्याच्या सुचना कर्मचायांना दिल्या. यानुसार शुक्रवारी संजय दिगंबर गुमास्ते (रा. सदरबझार) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.