Wed, Sep 26, 2018 20:03होमपेज › Satara › सातारा : खटाव-वाकेश्वरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

सातारा : खटाव-वाकेश्वरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

Published On: Dec 15 2017 2:59PM | Last Updated: Dec 15 2017 2:59PM

बुकमार्क करा

वडूज : वार्ताहर

वाकेश्वर ता.खटावमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी धुमाकूळ घातला. एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करून सुमारे ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

अधिक माहीती अशी, गुरूवारी मध्यरात्री वाकेश्वर येथील संतोष जालिंदर मदने यांच्या घरात घुसून दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरले. तर महादेव जयसिंग जावीर यांच्या घरातून एक तोळे व तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व मुलीच्या पायातील चांदीच्या पट्टया असा ३२००० रुपयांचा ऐवज लंपास केला. घटना स्थळावर श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.