Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Satara › वाहने झाली उदंड...रस्ते मात्र अरूंद

वाहने झाली उदंड...रस्ते मात्र अरूंद

Published On: Mar 08 2018 9:12PM | Last Updated: Mar 08 2018 9:09PMसातारा  : प्रतिनिधी

जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत गत 10 वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यामध्ये सर्वच प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.  बदलत्या परिस्थितीत माणसांचे राहणीमान उंचावले आहे. पूर्वी अपवादाने गावात दिसणारे वाहन आता घरोघरी आढळू लागले आहे. एवढेच काय एकेका घरात तीन-तीन, चार-चार वाहने असून दुचाकीबरोबरच चारचाकी व मोठ्या वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. ट्रक, स्कूल बस, रिक्षा, टँकर, रुग्णवाहिका, मिनीबस, अ‍ॅपेरिक्षा, टेंपो आदि मोठ्या वाहनांचा समावेश आहे. एका बाजूला वाहने वाढत असली तरी रस्ते मात्र अपुरे पडू लागली आहेत. राष्ट्रीय महामार्ग दुपदरीवरून चारपदरी व सहापदरीवर गेला. आता भविष्यात तो आणखी वाढेल. मात्र, राज्य, तालुका व गाव पातळीवरील रस्त्यांचे रूंदीकरण करताना अनेक समस्या उभ्या राहत आहेत. 

जिल्ह्यात लाखोंच्या घरात वाहने असून  त्यापैकी 75 टक्के दुचाकी वाहने आहेत. बहुतांश दुचाकी फोरस्ट्रोक असल्याने इतर प्रवासी व माल वाहतूक करणार्‍या वाहनांच्या तुलनेत या वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुराचे प्रमाण कमी आहे. वाहनांमधून बाहेर पडणार्‍या धुराचे प्रमाण अधिक असेल तर ते किती आहे. त्यामध्ये विविध वायूंचे प्रमाण काय? याची मोजदाद करण्यासाठीची यंत्रणा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे असली तरी वाहनांची वाढणारी प्रचंड संख्या अनेक समस्यांची डोकेदुखी वाढवत आहे.