Fri, Apr 26, 2019 17:56होमपेज › Satara › खड्डे मुजवणारे वाहन पाण्यात कोसळले

खड्डे मुजवणारे वाहन पाण्यात कोसळले

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:23PM

बुकमार्क करा

कातरखटाव : वार्ताहर

‘कातरखटाव-वडूज मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे प्रवाशांची होतेय दमछाक’ अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खड्डे मुजवण्यासाठी आलेले वाहन चक्क पाण्यात कोसळण्याचा प्रकार  कातरखटाव मार्गावरील पुलावर घडला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन क्र. एम एच 11 ए एल 1841  हे खड्डे मुजवण्यासाठी खडी घेऊन पुलावर आले होते. त्याठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरु होते. पुलाखाली पाणी असल्याने व वाहन अवजड असल्याने पुलावरील मातीस वाहनाचा बोजा सहन न झाल्याने तेथील माती खचून वाहन अक्षरश: पाण्यात पडले. चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारून आपला जीव वाचवला. किरकोळ दुखापत त्या चालकास झाली आहे. 

विशेष म्हणजे काम चालू आहे वाहने सावकाश चालवा, असा फलक लावलेली बांधकाम खात्याचेच अवजड वाहन पाण्यात पडल्याने लोकांच्यात हशा निर्माण झाला. दरम्यान यामुळे रस्ता खचून ऊस वाहतुकीची अवजड वाहने जाग्यावर थांबून राहिली आहेत. वाहन पाण्यात पडल्यानंतर ऑईल बंधार्‍यातील पाण्यामध्ये पसरल्याने माशांची तडफड सुरु झाली. परिसरातील लोकांनी लगेचच वाहनाकडे धाव घेतली. त्यांनी चालकाची विचारपूस केली. या प्रकाराने थोड्याच वेळात त्या पुलावरील वाहतूक ठप्प झाली.