Wed, Jul 24, 2019 12:25



होमपेज › Satara › कारवाईसाठी महसूल विभागाचे पाय जड का?

कारवाईसाठी महसूल विभागाचे पाय जड का?

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:32PM

बुकमार्क करा





सातारा : प्रतिनिधी

सालपे, हिंगणगाव व ढवळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. मात्र, तरीही महसूल विभागाकडून या वाळूचा पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पाय जड का झाले? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फरार झालेल्या ट्रकचाही थांगपत्ता लागलेला नसल्यामुळे संबंधित ट्रकमालकाला शोधून कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

सालपे, हिंगणगाव व ढवळे गावच्या परिसरातील हजारो ब्रास केलेल्या वाळू उत्खननाच्या जागेचा पंचनामा केला तर मूळ मालक व वाळू किती, कोणी उपसली याचा पत्ता लागेल. कुणाची किती वाहने रोज भरून जात होती? कुणाचे जेसीबी रोज दिवस-रात्र त्या ठिकाणी वाळू उपसत होते? याची सर्व माहिती वाळू उपसा केंद्रावर गेल्यानंतर नक्‍कीच मिळेल.  झोपल्याचे सोंग घेतलेल्या महसूल विभागाचे खिसे गच्च भरल्यामुळे महसूल विभाग या अनधिकृत वाळू उपशाचे बिंग फुटल्यामुळे केवळ थातुरमातूर पंचनामा करण्याशिवाय दुसरी काहीच कारवाई करणार नसल्याचे चित्र पुढे येत आहे.