Tue, Jul 23, 2019 11:06होमपेज › Satara › टेम्पो दरीत कोसळून एक ठार, दोन गंभीर

टेम्पो दरीत कोसळून एक ठार, दोन गंभीर

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 10:48PMवाई : प्रतिनिधी

महाबळेश्‍वर येथे चित्रीकरणाचे काम आटपून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो क्र. एमएच 04 एचडी 4690 पाचगणी घाटात दरीत 600 फूट खाली कोसळून एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर वाईत खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती अशी की, रात्रीचे चित्रीकरण उरकून इलेक्ट्रीक साहित्य घेऊन जाणारा टेम्पो पहाटे 5.15 वा. बुवासाहेब मंदिर नजिक पाचगणी घाटात कोसळला.

यामध्ये वाहनातील पपूराम आजिवन जयस्वान (वय 38)रा. अलहाबाद उत्तरप्रदेश हा जागेवर मयत झाला. चालक रमेश मोतीलाल जयस्वाल (वय 58) रा. अलहाबाद हल्ली मुंबई गोरेगाव व फत्तेबहादूर अमृतलाल बिंद (वय 32) रा. मुंबई हे जखमी झाले. या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून इलेक्ट्रीक साहित्यासह सुमारे लाखोंचे नुकसान झाले. एसओएस ग्रुप पाचगणी व नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. याप्रकरणी चालक रमेश जयस्वाल याच्याविरुद्ध  फत्तेबहादूर बिंद याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कदम करीत आहेत. 

 

Tags : satara, satara news, Panchgani, valley, tempo, collapsed,