Sun, Sep 23, 2018 12:43होमपेज › Satara › कळंबीनजीक अपघातात विद्यार्थी जागीच ठार

कळंबीनजीक अपघातात विद्यार्थी जागीच ठार

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:37PM

बुकमार्क करा
औंध/पुसेसावळी : वार्ताहर

खटाव तालुक्यातील कळंबी येथे पुसेसावळी -औंध दरम्यानच्या रस्त्यावर शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तुकाराम बाळासो घार्गे (वय 17 वर्षे) हा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. तुकाराम हा दुचाकीवरून (क्रमांक एमएच11 बीएम 9255) वडगाव रहाटणी रस्ता येथून निघाला होता. जाताना त्याने  जेवण करुन येतो, असे सांगितले होते. वडगाव येथून गेलेल्या तुकारामचा अपघात हा कळंबीनजीक झाल्याने या अपघाताबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी,भाऊ असा परिवार आहे. 

तुकाराम हा औंध येथील विद्यालयात  सायन्स शाखेत शिक्षण घेत होता. त्याचा लहानपणापासून आत्या व मामाने सांभाळ केला होता.तो कॉलेज शिक्षण घेत घरची शेती पाहत होता. त्याच्या अचानक जाण्याने वडगाव ग्रामस्थ व मित्रमंडळीत हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी संतोष घार्गे यांनी औंध पोलीसांत तक्रार दिली आहे.पुढील तपास हवालदार एस.बी.रसाळ करीत आहेत.