Sat, Jul 20, 2019 15:07होमपेज › Satara › उच्च न्यायालयाकडून परवाने वाटपाला ६ आठवड्यांची स्थगिती

उच्च न्यायालयाकडून परवाने वाटपाला ६ आठवड्यांची स्थगिती

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 10:18PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वर व पाचगणी येथे टॅक्सी व रिक्षांना परवाने देऊ नयेत यासाठी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने  परवाने खुले करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

शासनाने पाच महिन्यांपूर्वी टॅक्सी व रिक्षा परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. वाहनांची संख्या विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला होता. हे परवाने देऊ नये यासाठी महाबळेश्‍वर व पाचगणीतील टॅक्सी संघटनांनी आंदोलन केले होते. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळी अद्याप परवाने वाटप करण्यात आले नसल्याचे सांगितल्यानंतर उच्च न्यायालयानेे परवाने वाटप करताना टॅक्सी संघटनांना विश्‍वासात घ्या, असे आदेश दिले होते.

त्यानंतरही परवाने देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पुन्हा टॅक्सी संघटना उच्च न्यायालयात गेली होती. या याचिकेत महाबळेश्‍वरमध्ये टॅक्सी व रिक्षा चालकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते व वाहतूक कोंडीवर पर्याय नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर उच्च न्यायालयाने परवाने खुले करण्याच्या निर्णयाला सहा आठवडयांची स्थगिती दिली आहे.