Thu, May 23, 2019 04:45होमपेज › Satara › उंब्रज येथे ग्रंथ दिंडीने त्रिवेणी साहित्य संमेलनास प्रारंभ

उंब्रज येथे ग्रंथ दिंडीने त्रिवेणी साहित्य संमेलनास प्रारंभ

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 8:35PMउंब्रज : प्रतिनिधी 

उंब्रज ता. कराड येथे  राज्यस्तरीय  त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

येथील म. गांधी विद्यालयाच्या   प्रांगणात  त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मान्यवर व संयोजक समिती, नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सुरू झालेल्या  ग्रंथदिंडी मध्ये चित्ररथ,  येथील सर्व शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी तसेच  विविध वेषभूषा केलेले  विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते. वाटेगाव येथील लेझिम पथक, टाळ मृदुंगाचा गजर करणारे वारकरी,  त्या पाठोपाठ पारंपारिक वेशभूषा परीधान केलेले विदयार्थी होते.  

महिला महाविद्यालयाच्या  युवती थोर क्रांतीकारकांच्या वेषभूषा परिधान करून घोड्यावर स्वार झाल्या होत्या. तसेच  साहित्य, शिक्षण, स्वच्छता  फलक, झळकत होते. ग्रंथ दिंडी  सुरभी चौकातून सरळ माणिक चौक मार्गे छ. शिवाजी महाराज पुतळ्या नजीक आली. त्यावेळी शिवाजी महाराज पुतळयासमोर युवतींनी तसेच वाटेगाव येथील मंडळाने दांडपट्टा व लेझिम  सादर केले. यावेळी छ.शाहू महाराज, छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साईबाबा यांची वेषभूषा परिधान केलेल्या मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. 

साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेला भव्य दिव्य मंडप विद्यार्थी, विद्यार्थिनी भरगच्च  भरून गेला. यावेळी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्रात सुनिता राजेंद्र जाधव यांचे सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य याविषयी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला जाधव होत्या प्रास्ताविक संजय पाटील  यांनी केले. आभार सुरेश साळुंखे यांनी मानले.