Wed, Apr 24, 2019 08:08होमपेज › Satara › बहिणीची दोन भावांविरुद्ध तक्रार

बहिणीची दोन भावांविरुद्ध तक्रार

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:07PMसातारा : प्रतिनिधी

नावावर असणारे घर दोन्ही भावांनी परस्पर बांधकामाला काढून त्यावर बहिणीची खोटी सही केल्याप्रकरणी बहिणीने दोन्ही भावांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी आर्किटेक्‍चरवरही गुन्हा दाखल झालेला आहे.इक्बाल शब्बीर बागवान, शहानूर शब्बीर बागवान (दोघे रा. रामाचा गोट) व आर्किटेक्‍चर शंकर कुंभार या तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सौ.अलमास नसीम बागवान (सध्या रा. कोंढवा, पुणे) यांनी तक्रार दिली.

तक्रारदार अलमास बागवान यांचे माहेर सातारा असून शहानूर व इक्बाल हे दोघे त्यांचे भाऊ आहेत. या तीन बहीण-भावांच्या नावावर सातार्‍यातील घर आहे. असे असताना दोघा संशयित भावांनी बहिणीला न सांगता परस्पर घराच्या बांधकामाला सुरुवात केली. याबाबतची माहिती तक्रारदार यांना समजल्यानंतर बांधकाम परवान्याबाबत माहिती घेतली असता त्यावर त्यांची खोटी, बोगस सही करण्यात आली असल्याची माहिती समजली. यामुळे तक्रारदार अलमास बागवान यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीमध्ये संबंधित काम आर्किटेक्‍चर व इंटेरिअर डिझाईनर शंकर कुंभार हे करत असल्याने त्यांच्याविरुद्धही तक्रार दाखल आहे.