Sat, Jan 19, 2019 07:58होमपेज › Satara › बेड्यासह पळालेला गुंड कारमध्ये सापडला

बेड्यासह पळालेला गुंड कारमध्ये सापडला

Published On: Apr 05 2018 11:59PM | Last Updated: Apr 05 2018 11:59PMसातारा : प्रतिनिधी

शाहूपुरी पोलिस ठाण्यातून दिनांक १ जानेवारी रोजी बेड्यासह पळून गेलेल्या कैलास गायकवाड या तडीपार संशयिताला गुरुवारी सातारा पोलिसांनी पकडले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तो पोलिस ठाण्यातून पळून गेल्याने शाहूपुरी पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली होती.

कैलासवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळेच त्याला सातारामधून तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही तो सातारामध्ये फिरत असल्याने एलसीबीने त्याला अटक करून १जानेवारी रोजी शाहूपुरी पोलीसांकडे वर्ग केले होते. पोलिस ठाण्यात असतानाच कैलासने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यासह पळ काढला होता. 

Tags : satara district, gangster