Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › दिवशी घाटात दरड कोसळण्याचा धोका

दिवशी घाटात दरड कोसळण्याचा धोका

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 8:47PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

मालदन पासून दिवशी ते मरळी पर्यंत असणार्‍या सुमारे15 कि.मी.लांब व दर्‍या खोर्‍यांनी व्यापलेल्या डोंगर रांगानी विभक्त केलेला ढेबेवाडी विभाग पाटणला जोडण्याचे काम मालदन- दिवशी व  मरळी  घाटाने केले आहे. हा अवघड आणि वळणाचा घाट दरवर्षी लक्षावधी रूपये खर्चूनही कायम धोकादायक असतो. हे विभागाचे दुर्दैव की संबधित बांधकाम विभागाचे अपयश ? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र गेल्या चाळीस वर्षात कुणीही शोधलेले नाही. हा घाट धोकामुक्त करा अशी मागणी चाळीस वर्षानंतरही कायम आहे.ढेबेवाडी-साबळेवाडी मार्गे आणि ढेबेवाडी- मालदन मार्गे घाट रस्ता जोडणारा हा रस्ता नागमोडी आणि अनेक धोकादायक वळणाचा आहे.

ढेबेवाडी बाजूकडून जातांना साबळेवाडी पासून व मालदनकडून जाताना मालदन पासूनच चढ सुरू होतो. हा चढ पाच/ सहा कि.मी.घाटच्या माथ्यावर जाईपर्यंत आहे. याची उंची अंदाजे दीड हजार फुट आहे. माथ्यावरून भिलारेवाडी ते वाल्मिक मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यापासून  पाटण रस्त्याला दिवशी घाटाचा उतार सुरू होतो. हा उतारसुद्धा वळणा वळणाने खाली मरळी घाटापर्यंत आहे. दिवशी घाटापासून पुढे मरळी घाट सुरू होतो.

या घाटापासून पुन्हा  अडीच ते तिनशे फुट इतका उतार आहे. या संपुर्ण 15 कि.मी.अंतरात ढेबेवाडी बाजुला 6 किमीअंतर असून या अंतरात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी एकाद्या वाहनावार असे दगड वा मुरूम माती  कोसळली तर ?  पाटणकडे जाताना घाटमाथ्या पासून दिवशीघाट आणि पुढे मरळीघाटाने मरळी गावापर्यंत अरूंद व धोकादायक वळणे आहेत. या रस्त्यासाठी चारच वर्षापूर्वी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सात कोटी मंजूर केले होते. त्यातून हे काम गेल्या दोन वर्षा पासून सुरूआहे मात्र त्या कामाच्या निकृष्टते बाबत आज सुद्धा तक्रारी सुरू आहेत.