Fri, May 29, 2020 19:06होमपेज › Satara › तीन गावांमधील डासांची पुण्याकडे ‘रवानगी’

तीन गावांमधील डासांची पुण्याकडे ‘रवानगी’

Published On: Dec 03 2018 1:43AM | Last Updated: Dec 02 2018 10:45PMसातारा : प्रवीण शिंगटे

सातारा जिल्ह्यातील वाई, म्हसवड, फलटण या नगरपालिका क्षेत्राबरोबरच वडूज, कोरेगाव, लोणंद या नगरपंचायत क्षेत्रात डासांचा उच्छाद वाढला आहे.कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक कराड तालुक्यातील गणेशवाडी व घराळवाडी या गावातील एडिस एजिप्टाय डास पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे संशोधनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

जिल्ह्यात डासांचा उपद्रव वाढला आहे. विशेषत: नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात अधिक स्वरूपात प्रादुर्भाव दिसून येत आहे. सन 2013 मध्ये मलेरियाच्या रूग्णांचे  5 लाख 18 हजार 327 रक्तांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये 311 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यूच्या 96 रूग्णंचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये 29 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनिया रूग्णांचे 8 नमुने घेण्यात आले त्यामध्ये  2 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.

सन 2014 मध्ये मलेरिया रूग्णांचे  5 लाख 72 हजार 123 रक्तांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 260 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यूचे 502 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यामध्ये 71जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनियाचे 4 नमुने घेण्यात आले त्यामध्ये  3 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.

सन 2015 मध्ये मलेरिया रूग्णांचे  5 लाख 86 हजार 874 रक्तांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 171 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यूचे 988 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यामध्ये 111 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनियाचे 12 नमुने घेण्यात आले त्यामध्ये  7 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.

सन 2016 मध्ये मलेरिया रूग्णांचे 5 लाख 70 हजार 812 रक्तांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 134 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यूचे 809 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यामध्ये 74 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनियाचे 24 नमुने घेण्यात आले त्यामध्ये  11 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले. सन 2017 मध्ये मलेरिया रूग्णांचे  5 लाख 87 हजार 115 रक्तांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 113 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यू रूग्णांचे  698 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यामध्ये 127 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनियाचे 204 नमुने घेण्यात आले त्यामध्ये  59 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.

सन 2018 मध्ये  ऑक्टोबरअखेर मलेरिया रूग्णांचे 3 लाख 75 हजार 802 रक्तांचे नमुने तपासण्यात आले त्यामध्ये 73 जणांचे रक्तांचे नमुने दुषित आढळून आले. डेंग्यू रूग्णांचे 766 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले त्यामध्ये 88 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.चिकुन गुनियाचे 52  नमुने घेण्यात आले त्यामध्ये  36 जणांचे नमुने पॉझीटिव्ह आढळले.

सातारा जिल्ह्यातील  वडूज, कोरेगाव, लोणंद या नगरपंचायती व वाई, म्हसवड, फलटण या नगरपालिका क्षेत्रात डासांचा उच्छाद वाढला आहे. तर शिरवळ, ओंड, साखरवाडी, येरफळे, मायणी, रेठेर बुं, शंभूखेड, विडणी व तांबवे ही गावे डेंग्यू व चिकुन गुनियाच्या बाबतीत हायरिस्क बनली आहेत.

आरोग्य कर्मचार्‍यांनी जिल्ह्यातील 1 हजार 832 गावामधील  2 लाख 85 हजार 853 घरांची तपासणी केली.त्यापैकी 4 हजार 13 घरामध्ये डासअळी आढळून आली. तसेच 4 लाख 78 हजार 660 कंटेनर तपासण्यात आले. त्यापैकी 4 हजार 280 कंटेनरमध्ये डास अळी आढळून आली.  तसेच किटक समाहरकांनी 13 गावामधील 1 हजार 119 घरांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये 151 घरामध्ये डासअळी आढळून आली.तसेच 2 हजार 224 कंटेनरची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये 215 ठिकाणचे कंटेनर दुषित आढळून आले.

आजार व प्रसाराची कारणे

डासाचे अ‍ॅनाफिलीस, क्युलेक्स व एडिस एजिप्टाय असे प्रकार आहेत. अ‍ॅनाफिलीस डासामुळे हिवताप (मलेरिया) चा प्रसार होतो. अ‍ॅनाफिलीस डास हा स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतो.एडिस एजिप्टाय डासामुळे डेंग्यू व चिकुनगुन्या या आजारांच्या  विषाणुचा प्रसार होतो. डेंग्यू व चिकुनगुन्या हे आजार विषाणुजन्य आहेत. एडिस इजिप्टाय डास घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी रांजण, हौद, फुटके डबे, कुलर इत्यादी ठिकाणच्या पाण्यात अंडी घालतात.क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग व जापनीज ऐन्सफिलायटीचा प्रसार होतो.क्युलेक्स डास हा घाण साठवलेल्या  गटाराच्या , सेप्टीक टँक पाण्यात अंडी घालतो. 

 नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.दर आठवड्याला एकदा रांजण,माठ, टाक्या, हौद रिकामे करून आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडे करून पाणी भरावे, झाकण लावावे. टायर, भंगार वस्तुमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.ताप आला तर उपचार घ्यावा.- सौ. ए.एम. जंगम, जिल्हा हिवताप अधिकारी