Sat, Apr 20, 2019 18:07होमपेज › Satara › लग्नपत्रिकेतून बिया देऊन वृक्षलागवडीचा दिला संदेश

लग्नपत्रिकेतून बिया देऊन वृक्षलागवडीचा दिला संदेश

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 9:00PMकराड : प्रतिनिधी

वृक्षसंपदा नष्ट झाली तर अवघे जनजीवन नष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे यासाठी शासनाकडून सातत्याने मात्र नागरिकांमध्यही ही जनजागृती होणे तितकेच गरजेचे आहे. वृक्षलागवड ही काळाची गरज आहे याची जाणीव झाल्यानेच चक्क लग्नपत्रिकेच्या कागदामध्येच रोपांच्या बिया देऊन वृक्षलागवड करण्याचा संदेश वेगळ्या पध्दतीने देण्यात आला आहे.  

कराड येथील दिलीप भिमराव जाधव यांनी त्यांची द्वितीय कन्या शिवानी हिच्या लग्नपत्रिकेच्या कागदामध्ये ‘मारीगोल्ड’ या वनस्पतीच्या बिया  रोवून ती पत्रिका सर्वांना दिली आहे. या पत्रिकेत वधूˆ वरांच्या नावाबरोबरच पत्रिकेतील बियांबद्दल माहिती सांगण्यासाठी एक चिठ्ठीही देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की ‘विवाह संपन्न झाल्यानंतर या पत्रिकेचे चार तुकडे करा, ते भिजवून कुंडीत अथवा जमिनीत, मातीत झाकून ठेवा. थोड्यात दिवसात त्यातील बियांपासून रोपे उगवतील’.  पत्रिकेच्या माध्यमातून वृक्षलागवडीचा संदेश जाधव कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.