Wed, Jan 23, 2019 17:43होमपेज › Satara › पोलिसांच्या सतर्कतेने चिमुरडीला मिळाली आई

पोलिसांच्या सतर्कतेने चिमुरडीला मिळाली आई

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:00PM

बुकमार्क करा

उंब्रज : प्रतिनिधी

उंब्रजच्या आठवडी बाजारात आई हरविलेली चिमुरडी स्थानिक पत्रकार व उंब्रज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली.

उंब्रज ता.कराड येथील आठवडी बाजारात सकाळी 11 च्या सुमारास कन्या शाळेलगत सानिया ही तीन वर्षाची मुलगी रडत होती. सौ. अनिता रणजित पवार यांनी त्यांचे पत्रकार असलेले दिर अभिजीत पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार व प्रवीण कांबळे बाजारपेठेत गेले. त्यांनी मुलीच्या आईची शोधाशोध केली मात्र गर्दीत थांगपत्ता लागत नव्हता.

त्यांनी सदर मुलीला उंब्रज पोलीस ठाण्यात आणले.  पोलिस निरीक्षक  जोतिराम गुंजवटे यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस गाडीच्या सहाय्याने मुलगी हरवल्याचे पुकारण्याच्या करण्याचा सूचना दिल्या.  अवघ्या दहा मिनीटात मुलीची आई पोलिस गाडीजवळ आली. मुलगी पोलिसांकडे सुखरूप असल्याचे पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.