Fri, May 24, 2019 21:15होमपेज › Satara › सर्वात मोठ्या पोस्ट कार्डची ग्लोबलमध्ये नोंद

सर्वात मोठ्या पोस्ट कार्डची ग्लोबलमध्ये नोंद

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 9:03PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या नागठाणे सेवा केंद्राने बनविलेल्या पोस्ट कार्डची जगातील सर्वात मोठे पोस्टकार्ड या विक्रमात ग्लोबल रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पाली ता. कराड येथील खंडोबाच्या यात्रेत येणार्‍या भाविकांना शांती संदेश देण्यासाठी हे पोस्टकार्ड बनविण्यात आले होते. हे पोस्ट कार्ड पाली येथे दि. 5 जानेवारीपर्यंत भाविकांना पाहता येणार आहे. 

पोस्ट कार्डचा यापूर्वीचा विश्‍वविक्रम इकोशूज यांच्या नावे होता. 14 डिसेंबर 2014 मध्ये हाँगकाँग येथील इकोशूज यांनी 615.56 स्क्वेअर फूट सर्वांत मोठे पोस्टकार्ड बनविले होते. ब्रह्माकुमारीज नागठाणे व डॉ. दीपक हरके यांनी 1559.94 स्क्वेअर फूटाचे सर्वांत मोठे पोस्ट कार्ड बनवून नवीन विश्‍वविक्रम बनविला. 

राज्याचे जलसंधारण, जलसंपदा राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी ग्लोबल रेकॉर्डचे प्रमाणपत्र नागठाणे ब्रह्माकुमारीच्या संचालिका बी.के. सुवर्णादिदी व 50 विश्‍वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके यांना पुरंदर येथे प्रदान केले.