Sat, Sep 22, 2018 03:32



होमपेज › Satara › मृत व्यक्ती जिवंत दाखवून जमीन बळकावली 

मृत व्यक्तीजिवंत दाखवून जमीन बळकावली 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सातारा : प्रतिनिधी

मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून चिंचणेर येथील जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सातारा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात याबाबतची खोटी कागदपत्रे तयार करुन दाखल केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हणमंत शंकर पानस्कर, संदीप शिवदास मांडवे, हणमंत शंकर शेडगे, यशवंत भानुदास डांगे, चंद्रकांत हणमंत डांगे (सर्व रा.चिंचणेर निंब, निगडी ता.सातारा) यांच्याविरुध्द आपआपसात संगनमत करुन फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कार्तिक मानसिंग पाटील (मूळ रा.बोरगाव ता.वाळवा, सांगली) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार कार्तिक पाटील यांच्या वडीलांच्या नावे चिंचणेर निंब येथे शेतजमीन होती व ती वाट्याने करण्यासाठी दिली होती. गेल्या काही वर्षापूर्वी तक्रारदार कार्तिक पाटील यांच्या वडीलांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी चिंचणेर निंब येथे असणारी वडीलांची जमीन अन्य काही जणांनी बळकावली असल्याची माहिती तक्रारदार कार्तिक पाटील यांना समजली.

तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रे बाहेर काढल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. वडीलांचा मृत्यू झाला असतानाही संशयितांनी शेतजमीन बळकवण्यासाठी वडीलांच्या खोट्या नावावर त्रयस्थ व्यक्ती उभी करुन सातारा निबंधक कार्यालयात खोटी कागदपत्रे तयार करुन जमीन बळकवली असल्याचे समोर आले. सर्व कागदपत्रे घेवून तक्रारदार सातारा शहर पोलिस ठाण्यात आले व त्यांनी संशयितांविरुध्द तक्रार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सपोनि श्रीकृष्ण पोरे पुढील तपास करत आहेत.

Tags : Froud, Crime, satara, Dead Person, Police, Arrested, 






  •