Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Satara › फलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक

फलटणमध्ये पेन्शनचे अमिष दाखवून जेष्ठांची फसवणूक

Published On: Feb 08 2018 6:47PM | Last Updated: Feb 08 2018 6:50PMफलटण : प्रतिनिधी 

जेष्ठ नागरिकांना मासिक ३ हजार रुपये पेंशन मिळवून देण्याचे अमिष दाखवून काही लोक शहरातील व ग्रामीण भागातील  जेष्ठ नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फलटणमध्ये तहसील व प्रांत कार्यालयाच्या परिसरात काही लोकांनी जेष्ठ नागरिकांना फसवण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अशा लोकांना ताबडतोब पकडून पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी जेष्ठ नागरिक करू लगले आहेत.

केंद्र किंवा राज्य सरकार मार्फत दरमहा ३ हजार रूपये पेन्शन देणारी  कोणतीही योजना अंमलात नाही. तरी अशा भुलथापांना सर्वसामान्य नागरिक बळी पडू नये. यासाठी गावपातळीवरील लोकसेवक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि पोलिस पाटील यांनी सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन याबाबत पुरेशी जनजाग्रुती करावी.

 विजय पाटील,  तहसीलदार फलटण