Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Satara › पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालक जागीच ठार 

पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालक जागीच ठार 

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 10:48PMकोरेगाव : प्रतिनीधी 

रहिमतपूर - तारगाव मार्गावर बोरगाव, ता. कोरेगावच्या हद्दीत उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुलावरुन कोसळला. या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून चालक जागीच ठार झाला. 

याबाबत रहिमतपूर पोलिसांनी  दिलेली माहिती अशी, नामदेव सिताराम चांदणे ( वय 60 रा, नाळेवाडी ता. अंबड, जि. जालना) हे ट्रॅक्टसह (एमएच 13 जे 7604) दोन मोकळ्या ट्रॉली घेवून बोरगाव मार्गे तारगावकडे निघाले होते. बोरगावच्या हद्दीत पुलावर त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर पुलावरून कोसळला.

यावेळी  पुलाच्या पश्‍चिम बाजुकडील बाजुला दोन्ही ट्रॉल्या अडकल्या तर पुढील ट्रॅक्टरसह चांदणे पुलावरुन कोसळले व ट्रॅक्टरखाली सापडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद विश्‍वासराव जाधव यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली असून तपास हवालदार रतन कांबळे करत आहेत.