Wed, Aug 21, 2019 17:56होमपेज › Satara › पाटण : कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर

कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर

Published On: Aug 13 2019 5:15PM | Last Updated: Aug 13 2019 5:15PM
पाटण : प्रतिनिधी 

महाबळेश्वर, नवजासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने सहा वक्री दरवाजे एका फुटाने कमी करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेऊन धरणातून प्रतिसेकंद 27 हजार 265 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25 हजार 287 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्यापेक्षा सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणातील एकूण पाणी साठ्यात घट होत आहे. धरणात आता एकूण 101.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 96.35 टीएमसी इतका झाला आहे. आगामी काळातील पाऊस व येणारे पाणी याचा विचार करून धरणाचे दरवाजे कमी - जास्त उघडझाप केले जातील, अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे.