Sun, Jul 21, 2019 16:39
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘पुढारी’ एज्यु दिशाची उत्कंठा वाढली 

‘पुढारी’ एज्यु दिशाची उत्कंठा वाढली 

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 11:17PMसातारा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वपूर्ण टप्पा असलेल्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेध लागलेत ते पुढील अ‍ॅडमिशनचे. जीवनाची दिशा ठरवणारा हा निर्णय घेताना सारेच विद्यार्थी अन् पालकही गोंधळून जातात. मात्र, आता ही चिंता सोडा. भविष्याचा अचूक वेध घेणारं ‘पुढारी’चं ‘पुढारी एज्यु. दिशा 2018’  हे भव्य शैक्षणिक   प्रदर्शन शुक्रवार दि. 8 पासून सुरू होत आहे. हे प्रदर्शन आता या विद्यार्थ्यांना अचूक दिशा दाखवण्यास उपयुक्‍त ठरणार आहे. त्यामुळे सार्‍याच विद्यार्थी व पालकांनी ‘नका गोंधळून जावू, आता पुढारीसोबतच राहू’, असा निर्धारच केला आहे, 

‘पुढारी’च्या  शैक्षणिक प्रदर्शनाला आता अवघे दोनच दिवस   उरले आहेत.  शैक्षणिक वर्तुळात या प्रदर्शनाची उत्कंठा वाढू लागली असून  येथील पोलिस करमणूक केंद्रात होणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा दाखवण्यास उपयुक्‍त ठरणार आहे. तज्ञांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही त्याची ओढ लागून राहिली आहे. नामांकित संस्थांबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, व्याख्याने प्रदर्शन काळात आयोजन केली आहेत.  प्रदर्शनामध्ये एमपीएससी, युपीएससी तयारी, आयटी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व संधी, इंजिनिअरिंगमधील संधी, फिशरीज, नॅनोटेक्नॉलॉजी तसेच करिअरच्या विविध संधी या विषयावर विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळणार आहे. या  व्याख्यानामधून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होणार आहे. ‘पुढारी’च्या या प्रदर्शनाची  शैक्षणिक वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. 12वीचा निकाल नुकताच लागला असून आता दहावीचाही निकाल लवकरच लागत आहे. त्यामुळे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना आता या प्रदर्शनाची ओढ लागून राहिली आहे. 

‘पुढारी’च्या प्रदर्शनामुळे  मुलांच्या करिअरची गाडी योग्य मार्गाला लागणार आहे. 

विद्यार्थ्यांसह पालकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून नामांकित शैक्षणिक संस्थांसोबत त्यांच्या दर्जेदार शिक्षणाची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. 

विज्ञान, कला, वाणिज्य, संरक्षण, कायदा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल 

मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील शिक्षणाची कवाडे खुली होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्‍त ठरणार असून ज्ञानपर्वाचा खजिनाच उपलब्ध होणार आहे.