Mon, Jan 27, 2020 03:21



होमपेज › Satara › उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील : नितीन बानुगडे पाटील 

उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील : नितीन बानुगडे पाटील 

Published On: Sep 12 2018 5:02PM | Last Updated: Sep 12 2018 4:58PM



कराड : प्रतिनिधी

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेची शिवसेनेची उमेदवारी द्यावी किंवा नाही याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सातारा सांगली जिल्हा संपर्कप्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

काही दिवसांपूर्वी दिवाकर रावते यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना उदयनराजे यांना छत्रपतींचे वारस म्हणून बिनविरोध निवडून दिले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यावर नितीन बानुगडे पाटील यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली.

गणेशोत्सवात डॉल्बी असावी की नसावी याबाबत संदिग्ध भूमिका घेताना त्यांनी सण उत्सव हे उत्साहात साजरे झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. मात्र दुसऱ्या बाजूला न्यायालयाच्या आदेशाचाही आदर राखला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.