Mon, Sep 24, 2018 11:57होमपेज › Satara › विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:25PMकोरेगाव : प्रतिनीधी 

वेळू, ता. कोरेगाव येथील विहिरीत मायलेकींचे मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.  सौ. सुप्रिया योगेश भोसले (वय 30) व कन्या आराध्या (वय 5) अशी या दुर्दैवी मायलेकींची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सौ. सुप्रिया या आराध्याला घेऊन घरातून निघून गेल्या होत्या. पती योगेश सोमवारी शेतात गेले होते. परत आल्यानंतर पत्नी व मुलगी घरात दिसत नसल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.

मात्र, त्या सापडत नव्हत्या. याच दरम्यान, अंभेरी मार्गावर माळवाडी नावाच्या शिवारातील विहिरीत सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास मायलेकींचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावात कळताच हळहळ व्यक्‍त करण्यात आली. या घटनेची फिर्याद राजेंद्र भोसले यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली. रहिमतपूर पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. तपास हवालदार निलेश डोंबे करत आहेत.