Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Satara › सरपंच संसदेसाठी एकसर गावची निवड 

सरपंच संसदेसाठी एकसर गावची निवड 

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:03PM

बुकमार्क करा

मेणवली : वार्ताहर

शासनाच्या वतीने पुणे येथे संपन्न होणार्‍या महाराष्ट्र सरपंच संसदेसाठी वाई विधानसभा मतदारसंघातून केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे वाईच्या पश्‍चिम भागातील एकसर याग्रामपंचायतीची निवड झाली आहे. 
गावच्या सर्वांगीण विकासात लोकांचा सहभाग व अन्य अभ्यासपूर्व प्रशिक्षणासाठी एकसरचे सरपंच मयुर चव्हाण यांना  संधी मिळणार आहे. पुणे येशील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीने पुणे येथील सेंटरमध्ये तीन दिवसीय महाराष्ट्र सरपंच संसद आयोजित करण्यात आली आहे.  

संपूर्ण राज्याच्या सर्व 288 मतदार संघातून उत्कृष्ठ काम केलेल्या प्रत्येकी एक प्रमाणे 288 ग्रामपंचायतींची मान्यवरांच्या निवड समितीच्या माध्यमातून निवड केली जाते.गावच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून तळमळ असणार्‍या सरपंच, उपसरपंचाला आदर्श पंचवार्षीक ग्रामविकास आराखडा तयार करता यावा, विकासासाठी भेदभाव विरहीत लोकांचे संघटन तयार करता यावे, केंद्र व राज्य शासन तसेच विविध औद्योगिक समूहांचे सहकार्य घेता यावे यासाठी मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.