Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Satara › निंभोरे येथे कारच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार जागीच ठार

निंभोरे येथे कारच्या धडकेत वृद्ध सायकलस्वार जागीच ठार

Published On: Mar 03 2018 7:38PM | Last Updated: Mar 03 2018 11:36PMफलटण : प्रतिनिधी

फलटण-लोणंद रस्त्यावर निंभोरे, (ता. फलटण) गावच्या हद्दीत कारने ठोकर दिल्याने वृद्ध सायकलस्वार जागीच ठार झाला.

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अभिजित चंद्रकांत गेंड (रा. तासगाव, जि. सांगली) हे फलटणहून लोणंदकडे कारमधून (एमएच 12 ईएक्स2507) जात होते. यावेळी सायकलवरून जात असलेले महादेव गंगाराम हापन (कासार) वय 65 यांना कारने जोराची धडक दिली. या अपघातात हापन जागीच ठार झाले. धडक एवढी जोरात होती की कारच्या समोरील बाजूसह काचेचेही  नुकसान झाले. त्या ठिकाणी मोठा आवाज आल्यानंतर आसपासच्या भागातील नागरिक घटनास्थळी धावले. तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.