Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Satara › बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:39PMखटाव : प्रतिनिधी 

पुसेगाव, ता. खटाव येथील किरण भिमराव दळवी (वय  21 ) या बेपत्ता युवकाचा मृतदेह घराजवळील ज्वारीच्या शेतात सडलेल्या अवस्थेत सापडला. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.भिमराव दळवी यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची  फिर्याद पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. येथील जुना बुध रस्ता तोडकरवस्ती नजीक असलेल्या राहत्या  घरातून हा मुलगा कोणास काहीही न सांगता निघून गेला होता. सध्या तो देगाव (सातारा)येथील डी.फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

ज्या दिवशी घरातून गेला त्याच दिवशी त्याची परीक्षा सुरू होती. जाताना त्याने त्याचा मोबाईल व इतर गोष्टी घरातच ठेवल्याने तपासात मोठी अडचण निर्माण होत होती. तरीही पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वत्र शोधाशोध सुरू होती. मात्र तब्बल 15 दिवसांनी गुरुवारी त्या युवकाचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या ज्वारीच्या शेतात सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या मृतदेहाजवळ कीटकनाशक औषधाची बाटली आढळून आली आहे.त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उचलणे शक्य नसल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सपोनि संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र, कुंभार तपास करत आहेत.