Fri, Jul 19, 2019 01:03होमपेज › Satara › भाकरवाडीतील अंध विद्यार्थिनी लैंगिक शोषणप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक

भाकरवाडीतील अंध विद्यार्थिनी लैंगिक शोषणप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:42PMकोरेगाव : प्रतिनिधी 

भाकरवाडी, ता. कोरेगाव येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेत गेल्या तीन ते चार वर्षांपासून अल्पवयीन अंध विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याला गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक कु. प्रेरणा कट्टे व परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कु. नंदा पाराजे यांनी ही कारवाई केली. 

याबाबत संबंधित विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी सन 2013 मध्ये झालेल्या लैंगिक शोषणप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने हा गुन्हा कोरेगावकडे वर्ग करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक कु. प्रेरणा कट्टे व परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कु. नंदा पाराजे,  हवालदार कमलाकर कुंभार व पोलिस नाईक मालोजी चव्हाण यांनी गुरुवारी अंध विद्यालयात जाऊन संशयित मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याला ताब्यात घेतले.