Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Satara › उत्तरपत्रिका पालकांच्या भेटीला

उत्तरपत्रिका पालकांच्या भेटीला

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 8:32PM

बुकमार्क करा

उंडाळे : प्रतिनीधी 

येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी दहावीच्या  विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या पालकांना दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन थेट पालकांना भेटण्याचा अनोखा उपक्रम येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाने राबवला आहे. त्याला पालक वर्गातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे . 

आपल्या पाल्याने परिक्षेत काय लिहिले आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता आपणाला काय केले पाहिजे त्याच बरोबर या उपक्रमाने शिक्षक-पालकांचा संपर्क वाढत असुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस त्यांचा चांगला फायदा होत असल्याने पालकांमधुन या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे . 

पालकांना शाळेत बोलवुन त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक  प्रगती सांगितली जाते. पाल्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची सुचना केली जाते. मात्र अशा मेळाव्यामध्ये पालक भितीपोटी येत नाहीत, अनेक विद्यार्थी कमी गुण मिळालेल्या कारणामुळे आपल्या पालकांना मेळाव्याची कल्पना देत नाहीत , परिणामी अनेक पालकांना आपल्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळत नाही . यावर विद्यालयाने नामी शक्कल लढवत पालकांना विद्यालयात न बोलवता शिक्षकांनीच पालकांच्या घरी जाण्याची युक्ती अवलंबली,सध्या सत्र परिक्षा एकचे निकाल लागले असुन त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका , त्यांना पडलेले गुण हे सर्व घेऊन शिक्षक शाळा सुटल्यावर सायकांळी पालकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विद्यार्थ्यांची प्रगती दाखवत आहेत . आपल्या पाल्याने उत्तरपत्रिकेत काय लिहिले आहे . त्याचे अक्षर कसे आहे , किती गुण पडले आहेत त्याचा ऑखो देखा हाल पालकांना पहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षकासमोर विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव होत आहे. सध्या केवळ दहावीच्या वर्गासाठी ही योजना राबवली जात आहे . 

शिक्षक रात्री नऊ पर्यंत पालक भेट करत असुन विद्यालयाच्या परिसरातील उंडाळे, टाळगाव,  साळशिंरबे, महारूगडेवाडी, जिंती, मनु, नांदगाव, पाटीलमळा, आदी गावात जाऊन ही योजना राबवत आहेत. प्राचार्य कुमार आडके, पर्यवेक्षक बी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक गावोगावी भेटी देत आहेत. शिक्षकांच्या या अनोख्या पालक भेटीचे परिसरात उत्फूर्त स्वागत होत आहे.