Sun, Jul 21, 2019 08:25होमपेज › Satara › ‘पुढारी’ फलटणकरांच्या घराघरांत व  काळजात 

‘पुढारी’ फलटणकरांच्या घराघरांत व  काळजात 

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:26PMफलटण : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी’ हे फलटणकरांचे काळीज पान आहे. गेली अनेक वर्षे फलटणकरांच्या समस्यांबरोबरच फलटणला राज्याच्या नकाशावर नेवून ठेवण्यात ‘पुढारी’ने नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे ‘पुढारी’ फलटणकरांच्या घराघरांत आणि काळजात आहे, अशा शब्दात फलटणच्या जनतेने ‘पुढारी’विषयी कौतुकोद‍्गार काढले. सातारा जिल्ह्यातील प्रचंड खपाचे व निःपक्ष व निर्भीड दैनिक असलेल्या ‘पुढारी’च्या फलटण संपर्क कार्यालयाचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी मान्यवरांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवत ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.  वर्धापनदिन स्नेह मेळाव्याला विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  तुडूंब गर्दीच्या साक्षीने स्नेहमेळावा चांगला रंगला. 

तालुक्यातील प्रत्येक घरात ‘पुढारी’ पोहोचला आहे. ‘पुढारी’ची बातम्यांची मांडणी व बातम्यांचा पाठपुरावा यामुळे तालुक्यात ‘पुढारी’चाच बोलबाला आहे. ‘पुढारी’ नि:पक्ष व निर्भीड भूमिका घेत असल्याने वर्धापन दिन सोहळ्याला मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली होती. वर्धापनदिनी सायंकाळी प्रथम ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दै. ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक हरिष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख नितीन निकम, जाहिरात प्रतिनिधी सचिन हांडे आणि तालुका प्रतिनिधी यशवंत खलाटे-पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी स. रा. मोहिते, योगेश निकाळजे, रोहित सोनवलकर, गणेश क्षीरसागर उपस्थित होते.

फलटण शहरातील शंकर मार्केट येथील नवीन जागेत कार्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतर दुसराच वर्धापनदिन साजरा करण्यात आला. तालुक्यात प्रथमच ‘पुढारी’ बातमी ब्रेक करत असल्याने आणि सत्यता असल्याने तालुक्यात एक विश्‍वसनीय दैनिक असल्याची  भावना  निर्माण झाली आहे. तालुक्यात बातमी आणि जाहिरातीसाठी  दै. ‘पुढारी’लाच  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच फलटण शहरासह ग्रामीण भागात घराघरात मनामनात ‘पुढारी’ने अव्वल स्थान पटकावले आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या मान्यवरांना ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत कृपया हार बुके आणू नयेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार फलटणच्या ‘पुढारी’ टीमला रोपे भेट म्हणून देण्यात आली. 

वर्धापनदिनी पंचायत समिती सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, दिगंबर आगवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलींद नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, पोनि प्रकाश सावंत, धनंजय साळूंखे, अ‍ॅड. नगरसिंह निकम, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, शिवाजीराव घोरपडे, अ‍ॅड. अशोकराव जाधव, नरेंद्र भोईटे, शरद जाधव,  सागर अभंग, शरद देशपांडे, सचिन घोलप, रमेश नाळे, धनंजय महामूलकर, नितीन यादव, सचिन भोसले, किशोर ननावरे, राजीव पवार, सचिन अभंग, अनिल शेंडे, सचिन खानविलकर, अनिलशेठ वेलणकर, किशोर देशपांडे, राजू काळे, पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, सुभाष भांबूरे, नासिर शिकलगर, युवराज पवार, विक्रम चोरमले, दिपक मदने, शक्ती भोसले, अ‍ॅड. रोहित अहिवळे, सतिश कर्वे यांच्यासह नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.