Thu, Jun 27, 2019 16:21होमपेज › Satara › कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रे सुरू

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रे सुरू

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:31PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पडणार्‍या पावसामुळे धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 18 हजार 588 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता लक्षात घेता सोमवारी कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रे सुरू करण्यात आली आहेत. यातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. धरणात आता एकूण 92.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे केवळ 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.  

कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या सर्वच ठिकाणी सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणार्‍या पाण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. सध्या येथे सरासरी प्रतिसेकंद 18 हजार 588  क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस व येणारा पाणीसाठा व साठवण क्षमता या सर्व बाबींचा विचार करून सोमवारी धरण पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रे सुरू करण्यात आली आहेत व त्यातून वीजनिर्मिती करून हे पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.

धरणात आता एकूण 92.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापैकी उपयुक्त साठा 87.06 टीएमसी , पाणीउंची 2153.3 फूट, जलपातळी 656.311मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 3807 मि. मी. , नवजा 3828     मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 3319 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.