Fri, Jan 18, 2019 09:46होमपेज › Satara › जिल्हा बँकभरती रद्दच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

जिल्हा बँकभरती रद्दच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:43PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक व शिपाईपदाची नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाच्या सहकार खात्याने  दिले होते. त्याविरोधात बँकेने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने राज्य शासनाच्या भरती रद्द आदेशाला स्थगिती दिली असल्याची माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. 

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया सन 2017 साली पूर्ण झाली होती़  या नोकर भरतीच्या अनुषंगाने काही तक्रारदारांच्या तक्रारींवरून सचिव, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश  बँकेस दिले होते. त्या आदेशाविरुद्ध बँकेने  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़  या याचिकेवर नुकतीच सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत शासनाच्या नोकर भरती रद्द करण्याच्या आदेशास स्थगिती दिली आहे.