Wed, Dec 19, 2018 22:03होमपेज › Satara › तेटली प्रकरणात आणखी दोघांना अटक

तेटली प्रकरणात आणखी दोघांना अटक

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:23PMसातारा/ बामणोली : प्रतिनिधी

तेटली, ता. जावली येथील बोगस सातबारा प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा निवृत्त पोलिस पाटलासह राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍याला अटक करण्यात आली.  त्यामुळे राजकीय वर्तुळासह महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

तेटली, ता. जावली, जि. सातारा येथील सर्व्हे नं. 104/2, 109/4 मधील पैकी जमीन 1 हेक्टर 10 आर, 60 गुंठे, 8 गुंठे असे सर्व्हे नंबर अस्तित्वात नसताना त्या सर्व्हे नंबरचे बनावट ऑनलाईन सातबारे  तयार केले. त्याद्वारे सातार्‍यातील बांधकाम व्यवसायिक कंग्राळकर यांची 20 लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कंग्राळकर यांनी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाचा तपास स्थानिक     गुन्हे अन्वेषण विभागाकडे (एलसीबी) सोपवण्यात आला आहे.

यापूर्वी एलसीबीने नितीन भानुदास काळे (वय 34 रा. सैदापूर, ता. सातारा), दिलीप भुवाल सहाणी (वय 27 रा. सैदापूर, सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, ता. खटाव),  राहुल आनंद धनावडे (वय 28, रा. विवर, ता. जावली), संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57 रा. सैदापूर, ता. सातारा), सारिका राजेंद्र जाधव (वय 37, रा. आंबवडे खु. ता. सातारा )  यांचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती. 

दि. 6 रोजी रात्री उशिरा एलसीबीने कोयना सोळशी कांदाटी क्रीडा असोसिएशनचा अध्यक्ष संतोष काशीनाथ मालुसरे (वय 40, रा. फूरुस ता. जावली) या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यासह सेवानिवृत्त पोलिस पाटील एकनाथ देवजी मालुसरे (वय 63, रा. केळघर तर्फ सोळशी ता. जावली) यांना अटक केली आहे.