Sun, Nov 18, 2018 13:55होमपेज › Satara › टेम्पो कालव्यात पडताच ‘ते’ झाले जागे

टेम्पो कालव्यात पडताच ‘ते’ झाले जागे

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:07PMखंडाळा : वार्ताहर 

बंगलोर-पुणे महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ चालकाला डुलकी आल्याने नियंत्रण सुटून आयशर टेम्पो धोम-बलकवडी कालव्यात कोसळला. गाडी  पाण्यात पडल्यानंतर मात्र, खडबडून जागे झालेले चालक व क्‍लिनर केबीनपाठीमागील ताडपत्री फाडून सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. 

बंगलोर येथून मुंबईकडे निघालेला टेम्पो (एमएच 02 ईआर 1756 हा रविवारी रात्री दीडच्या सुमारास खांबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. बोगद्यापासून पुढे असणार्‍या तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वळणावर असणार्‍या कॅनॉलच्या पुलाला घासून टेम्पो सरळ कालव्याच्या वाहत्या पाण्यात कोसळला.

यावेळी चालक विनोदकुमार पासी वय 37 (रा. अंधेरी मुंबई) यास झोप येत होती तर क्लीनर रणजित राम वय 27 ( रा.झारखंड) हा झोपलेला होता. गाडी पाण्यात पडल्यावर दोघेही जागे झाले. दरवाजातून बाहेर आल्यावर टेम्पोची पाठीमागची ताडपत्री फाडून गाडीतील शिडीच्या सहाय्याने दोघेही सुखरुप बाहेर आले.

या अपघात कोणीही जखमी झाले नसून टेम्पोचे किरकोळ नूकसान झाले. दोन क्रेनच्या साह्याने वाहन कालव्यातून बाहेर काढण्यात आले.