Sat, Jul 20, 2019 09:15होमपेज › Satara › मराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलकांची टीम दिल्लीत 

मराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलकांची टीम दिल्लीत 

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:41PMसातारा : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले, आंदोलनाचे मुख्य समन्वयक व जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, कवीवर्य बा. सी. मर्ढेकर समितीचे  सदस्य व जिल्ह पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने या प्रश्‍नासाठी केंद्र सरकारला सद्बुध्दी द्यावी यासाठी राजघाटावर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रार्थना करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा झाली असून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा होऊन मार्ग निघण्याची शक्यता असल्याची माहिती विनोद कुलकर्णी यांनी दिली. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसापच्यावतीने चळवळ सुरु करण्यात आली आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले आणि मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात येणार होते. त्यासाठी आंदोलकांची टीम गुरुवारी दिल्लीत दाखल झाली. परंतु दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली. आंदोलकांनी आम्ही शांततामय  मार्गाने आंदोलन करु, अशी ग्वाही दिली तरीही परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे उद्या दुपारी राजघाट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा प्रश्‍न सुटण्यासाठी केंद्र सरकारला सद्बुध्दी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. 

याबाबत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला पाहिजे. मराठीची गळचेपी होता कामा नये, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. मराठी भाषिकांबरोबरच भाषेची जपणूक करण्याची जबाबदारी सरकारचीही आहे. त्यामुळे केंद्र सरकाराने तातडीने या प्रस्तावाला मान्यता देऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान, आंदोलक व दिल्ली प्रशासन यांच्यामध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे वकील व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र दिल्लीस्थित अ‍ॅड. सुहास कदम यांनी शिष्टाई केली.आंदोलकाच्या टीममध्ये मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, मसाप पिंपरी चिंचवड प्रतिनिधी राजन लाखे, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर,  माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, नविआ पक्षप्रतोद अमोल मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, उद्योजक संतोष यादव, अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, राजू गोरे, जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश बाचल,  श्रीकृष्ण जोशी, वजीर नदाफ, सतीश घोरपडे, सोमनाथ पवार, राजेंद्र जगताप, वैभव पवार, विशाल कदम, सचिन सावंत, अक्षय जाधव, ओंकार भंडारी, अजित गुरव यांचा समावेश आहे.