Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Satara › शिक्षकाचा दहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

शिक्षकाचा दहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

दहावीतील विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षक प्रशांत जगन्‍नाथ सोनावणे याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शिक्षकानेच शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यातून माहिती मिळाली आहे. संशयित आरोपी प्रशांत सोनावणे हा एका शाळेवर शिक्षक आहेे. जानेवारी 2018 मध्ये शाळेची सहल गेली होती. सहलीवरून आल्यानंतर प्रशांत सोनावणे याने मुलीशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. फोन नंबर घेऊन त्यावरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. फोनवरून शिक्षकाने भेटण्याची इच्छा व्यक्‍त केली. कास पठारावर जाऊया असा आग्रह त्याने केला. कास पठारावर झाडाझुडपात शिक्षकाने शरीरसंबंध ठेवल्यानंतर ‘या घटनेची माहिती कोणालाही देऊ नकोस. माझ्या हातात 20 मार्क असून, ते मी तुला देईन,’ असे सांगून वारंवार अत्याचार केला. शिक्षकाने घरी नेऊनही अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्षकाकडून अत्याचार झाल्यानंतर मुलीच्या पोटात दुखत होते. 

मात्र,  पीडित मुलीने घाबरुन कोणालाही सांगितले नाही. अखेर शिक्षकाच्या पत्नीला फोनवरुन याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यानंतर कुटुंबियासोबत वादही झाला. अखेर या मुलीने शनिवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जावून शिक्षक प्रशांत सोनावणे याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर त्यानुसार पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक शोधासाठी गेले असता त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.